#MUMBAI : मालाड पूर्वमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; 50 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक;एका व्यक्तीचा मृत्यू, आगीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ व्हायरल

662 0

मुंबई : मुंबईतील मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये आत्तापर्यंत 50 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असल्याची माहिती मिळते आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान अद्याप देखील ही आग आटोक्यात आणता आली नसून ही आग किती भीषण आहे याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दूरवरून घेतलेल्या या व्हिडिओ मधून देखील धुराचे लोट दिसून येत आहेत

Share This News
error: Content is protected !!