पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा फेक कॉल मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये आला होता.
या निनावी फोन नंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण बिल्डिंगची कसून तपासणी करण्यात आली होती. परंतु अशी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही त्यानंतर ज्या व्यक्तींना हा धमकीचा फोन केला होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी दिलेली माहिती ही अक्षरशः विक्षिप्तपणाचा कळस आहे असंच म्हणावं लागेल. कारण पुण्यात राहणाऱ्या भावाशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हैद्राबादमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून गुगल ऑफिसच उडवून देण्याची धमकी दिली होती. ही धमकी त्यांना दारूच्या नशेत दिली होती.