Irrigation Scam Case : मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ; ” लवकरच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार ” …! रोख अजित पवारांकडे ?

274 0

मुंबई : मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे . सिंचन घोटाळा संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळासह युजर्स देखील त्यांच्या या खळबळ जनक ट्विटवर चर्चा करत आहेत .

आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पडदाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे . तसेच त्यांनी आणखीन एक ट्विट केले आहे , या ट्विटमध्ये त्यांनी अनिल देशमुख , नवाब मलिक , संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नाव लिहून पाचवी जागा रिक्त ठेवली आहे . या पाचव्या जागेवर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे रोख असल्याचं बोललं जात आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी आमचा ‘स्ट्राइक रेट 100% ‘ असं म्हटलं आहे .

सध्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी सुरू असताना कंबोजयांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आल आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide