केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

180 0

नवी दिल्ली- आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. लोक प्राप्तिकरातील बदलांची सर्वाधिक वाट पाहत होते परंतु त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून होतं तसेच घराच्या स्लॅबमध्ये कोणता बदल करण्यात येईल का या प्रतीक्षेत नागरिक होते.यंदाही कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना मात्र मोठा झटका लागला आहे. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्याची मोठी घोषणा केली आहे.

एकूणच या अर्थसंकल्पानंतर नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोकांची अवस्था ही सारखीच आहे. सोशल मीडियावर मिम्सद्वारे अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली जात आहे. नेटकरी मिम्सच्या सहाय्याने या अर्थसंकल्पाबाबत आपलं मत व्यक्त करताना सोशल मीडियावर दिसून येत आहे.

 

 

 

 

 

Share This News
error: Content is protected !!