नवी दिल्ली- आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवले आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या वस्तू महागणार आहेत हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे. जाणून घेऊया बजेटमध्ये काय महाग आणि काय स्वस्त झाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 18 वस्तूंचे भाव वाढले असून केवळ 8 वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मात्र जीएसटी मुळे अर्थसंकल्पातून स्वस्त आणि महाग करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. त्यामुळे काय महाग झाले आणि काय स्वस्त झाले याच्या बातम्या आता पाहायला मिळत नाहीत. तरीसुद्धा पुढील वस्तू स्वस्त झाल्या तर मोजक्याच वस्तू महाग झाल्याचं पाहायला मिळतंय.
काय स्वस्त झाले ?
कपडे, रत्न, हिरे, कृत्रिम दागिने, पेट्रोलियम उत्पादनासाठी लागणाऱ्या केमिकलवरील कस्टम ड्युटी, मोबाइल फोन, मोबाइल चार्जर, मिथेनॉलसह काही रसायनांवरील कस्टम ड्युटी
काय महाग झाले ?
सर्व आयात वस्तू, छत्रीवरील शुल्क २० टक्क्याने वाढले