अहमदाबादमध्ये अकरा मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये भीषण आग; पंधरा वर्षीय तरुणीचा गॅलरीत अडकल्याने होरपळून दुर्दैवी अंत

257 0

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी शाहीबाग भागात असणाऱ्या एका अकरा मजली इमारतीतील सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये घरात अडकल्याने एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

फ्लॅटमध्ये आग लागल्यानंतर या 15 वर्षीय तरुणीने बाल्कनीकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, ही तरुणी 25 ते 30 मिनिट या बाल्कनी मधून आपला जीव वाचवण्यासाठी लोकांकडे विनवणी करत होती. पण कुणालाही तिला वाचवता आलं नाही. अखेर तिचा होरपळून मृत्यू झाला.

माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू झालं होतं. या फ्लॅटमध्ये पाच जण होते. आग लागली तेव्हा चौघेजण बाहेर पडू शकले परंतु प्रांजल बाहेर पडू शकली नाही. अग्निशमन दल पोहोचून तरुणीला बाहेर काढेपर्यंत ती 100% भाजली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!