पुण्याच्या भरत नाट्य मंदिराशेजारी असलेली भारत इतिहास संशोधक मंडळाची वास्तू म्हणजे पुण्याचा मानबिंदू ! 7 जुलै 1910 रोजी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार मेहेंदळे यांनी या संस्थेची स्थापना केली. या इमारतीत संग्रहालय आणि चित्रशाळा आहे. यात राजमाता जिजाऊंपासून पेशव्यांपर्यंतची अनेक दुर्मीळ कागदपत्रं, चित्र, पुस्तकं, पोथ्या, वस्तू यांचा संग्रह आहे. पुण्याचं वैभव असलेल्या या वास्तूविषयी संस्थेच्या ट्रस्टी डॉ. अनुराधा कुलकर्णी काय म्हणाल्या पाहूयात…
