पुणे : पुण्यात रोज अनेक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल होतात. मात्र मागील दोन दिवसांत सेक्सटॉर्शनने दोन तरुणांनी टोकाचं पाऊस उचलले आहे. पुण्यात नेमकं घडतंय तरी काय आजच्या TOP NEWS INFO मध्ये सविस्तर पाहूया…
नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली.त्यानंतर पैसे न दिल्यास सोशल मीडियावर नग्न व्हिडीओ सेकंदात व्हायरल होतील, अशा शब्दांमध्ये मेसेज केले. या सगळ्या धमक्यांना घाबरुन पुण्यतील दोघांनी टोकाचं पाऊल उचललं.सायबर पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करणारे आणि डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक रोहन न्यायाधीश सांगतात सेक्सटॉर्शनचे दोन प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे वेगवेगळ्या ॲपच्या माध्यामातून खंडणीची मागणी करणं आणि दुसरा प्रकार म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणं किंवा फोटो मॉर्फिंग करणं.
मात्र यात नग्न व्हिडीओ काढून जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं हाच महत्त्वाचा आणि गंभीर सेक्सटॉर्शनचा प्रकार आहे.यात गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की, ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न होण्यास सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात अडकणाऱ्यांत सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे. त्यात 19 ते 27 वर्षांच्या तरुणांचं प्रमाण जास्त आहे.
कामाचा ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरुन होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात ओढले जातात असा दावा केला जातो.या सगळ्यात लैंगिक आकर्षण असतं. त्यामुळे मुलींबरोबर सेक्स चॅट करतात. या व्हिडीओच्या माध्यमातून तरुणांच्या गरजा पूर्ण होण्यात थोड्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे सहजपणे तरुण असं कृत्य करत असल्याचं तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणाऱ्या डॉ. श्वेता येवले सांगतात. तर रोहन न्यायाधीश सांगतात,पुण्यातील दोन्ही तरुणांनी सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यावर आत्महत्येचा पर्याय निवडला. यासाठी आपला समाज आणि सोशल मीडिया काही प्रमाणात जबाबदार आहे.
दोघांनांही समाजात बदनामी होईल याची भीती वाटली. त्याउलट त्यांनी जवळच्यांशी किंवा पोलिसांशी चर्चा केली असती तर टोकाचं पाऊल उचललं नसतं. यावर सोपा उपाय आहे. तुम्हाला पाठवलेला किंवा मॉर्फ केलेला फोटो तुम्हीच सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यासंदर्भातील स्पष्टीकरण देऊ शकता. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विरोधात आवाज उठवायला हवा. अनेकांशी संवाद साधायला हवा, जेणेकरुन अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं जाणार नाही.