गाढविणीच्या दुधाने स्त्रीचे सौंदर्य खुलते…. मनेका गांधी यांचा दावा… पाहा व्हिडिओ

821 0

गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या साबणामुळे स्त्रीचे सौंदर्य अबाधित राहते असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.

सुल्तानपूरच्या बल्दीराय येथे आयोजित एका कार्यक्रमात मनेका गांधी बोलत होत्या. मनेका गांधी यांनी म्हटले की, ” सध्या गाढवांची संख्या कमी झाली आहे. धोबीही कपडे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करत नाहीत. लडाखमध्ये एक समुदाय आहे ज्यांनी हे निरीक्षण नोंदवलं की गाढवांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे त्यांनी गाढविणीच्या दुधापासून साबण तयार करण्यास सुरूवात केली. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाने अंघोळ केल्यास स्त्रीचं शरीर कायम सुंदर राहतं. ती दीर्घकाळ सुंदर दिसते असा दावा मनेका गांधी यांनी केला आहे.

गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या साबणामुळे स्त्रीचं सौंदर्य अबाधित राहतं. इतिहासातली एक प्रसिद्ध राणी होऊन गेली.. तिचं नाव होतं क्लिओपात्रा. क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधाने अंघोळ करत होती. दिल्लीत गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण ५०० रूपयांना विकला जातो. असं असतानाही आपण बकरीच्या दुधापासून किंवा गाढविणीच्या दुधापासून साबण का तयार करत नाही?” असा प्रश्न मनेका गांधी यांनी विचारला. हा विडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!