मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांचा कार अपघातात ( Accident) मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात अन्य तीन कलाकार देखील जखमी झाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
काय घडले नेमके?
37 वर्षीय कोल्लम सुधी (Kollam Sudhi) यांच्या कारला सोमवारी पहाटे 4:30 च्या सुमारास त्रिशूरमधील कपमंगलम या ठिकाणी कारला अपघात झाला. सुधी वाटकारा येथील कार्यक्रमानंतर कोल्लम या ठिकाणी आपल्या घरी परतत होते. त्यासोबत त्यावेळी गाडीमध्ये कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे होते. हाती आलेल्या माहितीनुसार, कोल्लम सुधी यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहकाला धडकली. या अपघातात कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. तसेच कारमधील बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे देखील अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बिग बींच्या कुटुंबियांबद्दल ही रंजक माहिती तुम्हाला माहित आहे का?
गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल
कोल्लम सुधी यांची कारकीर्द
कोल्लम सुधीने 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘कंथारी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘कट्टापनायाले ऋत्विक रोशन’, ‘कुट्टनादन मारप्पा’, ‘थिटा रप्पई’, ‘वकाथिरिवू’, ‘अॅन इंटरनॅशनल लोकल स्टोरी’, ‘एस्केप’, ‘केसू ए वेदिंटे नाधान’ आणि ‘स्वर्गथिले कत्तुरुम्बू’ या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. कोल्लम सुधी यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.