Ajitabh Ani Amitabh

बिग बींच्या कुटुंबियांबद्दल ही रंजक माहिती तुम्हाला माहित आहे का?

500 0

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अशी ज्यांची ओळख आहे असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. मात्र आज आपण त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेऊया… त्यांच्या कुटुंबात पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या, लेक श्वेता नंदा व त्यांची मुलं सर्वांना परिचित आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या लहान भावा बद्दल सांगणार आहोत. त्यांचे नाव आहे अजिताभ बच्चन. ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, तसेच ते भारताच्या बाहेर राहतात.

अमिताभ बच्चन यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांचे पालक डॉ. हरिवंशराय बच्चन (Dr. Harivansh Rai Bachchan) आणि तेजी बच्चन (Teji Bachchan) यांना 18 मे 1947 रोजी दुसरा मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव अजिताभ बच्चन ठेवले. अमिताभप्रमाणेच अजिताभ यांनीही नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. अजिताभ हे खूप हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना बिझनेसची खूप आवड होती. यामुळे त्यांनी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या उद्योजकाच्या प्रवासाला सुरुवात केली. काही वर्षे भारतात काम केल्यानंतर अजिताभ लंडनला गेले आणि ते एक प्रतिष्ठित उद्योगपती बनले.

कोण आहेत अजिताभ बच्चन ?
अजिताभ हे क्यूए हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड, एएसएन हायड्रोकार्बन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एएसएन इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. अजिताभ (Ajitabh Bachchan) यांच्या पत्नीचे नाव रमोला (Ramola) आहे. यामध्ये सर्वात विशेष म्हणजे अमिताभ यांनी अजिताभ आणि रमोला यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमिताभ यांनीच त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली होती. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले, त्यांनी लग्न केलं आणि ते लंडनला गेले. अजिताभ आणि रमोला यांना भीम नावाचा एक मुलगा, व निलिमा, नम्रता आणि नयना नावाच्या तीन मुली आहेत.

Share This News

Related Post

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Posted by - May 1, 2022 0
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास…
The Kerala Story

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

Posted by - May 9, 2023 0
केरळ : वृत्तसंस्था – ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून देशात मोठ्या…

बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चा ट्रेलर पाहा

Posted by - February 11, 2022 0
मुंबई- पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटलेल्या छत्रपती शिवरायांना सुरक्षितपणे विशाळगडावर जाण्यासाठी स्वराज्याचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी अलौकिक शौर्य दाखवत घोडखिंडीमध्ये शत्रूला रोखून…

लावणी गायिका सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - December 10, 2022 0
लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालंय. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 च्या सुमारास फणसवाडीतील…

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट (व्हिडिओ)

Posted by - January 28, 2022 0
साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं नाव असून मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *