नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

366 0

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळतेय. नॅशनल हेराल्ड प्रकरणात खर्गे यांची चौकशी सुरू आहे .

प्राथमिक माहितीनुसार, खर्गे स्वतः आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात गेले. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु आहे. नॅशनल हेराल्डमध्ये करण्यात झालेल्या आर्थिक अनियमिततेची ईडीकडून चौकशी सुरू असून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२मध्ये या प्रकरणी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. खर्गे यांची ईडीने चौकशी सुरू केल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ डाली आहे.

काय आहे प्रकरण ?

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेरॉल्डची सुरुवात केली होती. २००८ मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. कंपनीवर 90 कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली . या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे 76 टक्के शेअर होते. तर इतरांकडे 24 टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला 90 कोटींच कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहण केलं होतं . 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. कोर्टाची नोटीस या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानें सोनिया गांधी , राहुल गांधी आणि अन्य आरोपींकडून उत्तर मागितलं होतं. न्यायामूर्ती सुरेश कैत यांनी गांधी कुटुंबाला नोटीस बजावले होते . तसेच ऑस्कर फर्नांडिस , सुमन दुबे , सॅम पित्रौदा आणि यंग इंडियाला 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं.

Share This News
error: Content is protected !!