पिंपरी- डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडली.
लाईफ लाईन क्लिनिकचे डॉ. प्रदीप पाटील यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजुषा संतोष भागवत असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून संतोष तुकाराम भागवत यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा यांना न्यूमोनिया झाला असताना त्यांच्यावर प्लेटलेट कमी झाल्याचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी वाकड येथील लाईफ लाईन क्लिनिकचे डॉ. प्रदीप पाटील यांच्यावर कलम 304अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.