मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

107 0

मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी (ncp) बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत.

काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी महापौर आसिफ शेख यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी या नगरसेवकांना मार्गदर्शनही केलं. तुम्ही आजपासून राष्ट्रवादीचे सैनिक झाले आहात. त्यामुळे जोमाने काम करा. राष्ट्रवादीची बदनामी होईल, पक्षाला गालबोट लागेल आणि पक्षाची प्रतिमा मलिन होईल असं कृत्य करू नका. आजपासून तुमची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. पक्षात तुमचा सन्मान होईल. तसेच तुम्हाला काम करण्याची पूर्ण मोकळीक असेल. आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो अशी तुमची भावना होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असं पवार म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले तरी या तिन्ही पक्षात पक्षवाढीसाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

दृष्टिक्षेपात राजस्थान ; सचिन पायलट ठरणार का राजस्थानचे एकनाथ शिंदे ?

Posted by - September 26, 2022 0
  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Posted by - March 9, 2024 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली. अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानं महाविकास…

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Posted by - June 3, 2022 0
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता  प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून…
Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023 0
नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *