अभिनेत्री श्वेता तिवारीने गंमतीत केलेले विधान आलंय तिच्याच अंगलट

152 0

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील एका वक्तव्यामुळे श्वेता चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती म्हणाली, ‘माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहे.’ तिचं हे विचित्र वक्तव्य ऐकून सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

श्वेता तिवारी दमदार अभिनयासह सौंदर्य आणि फिटनेससाठी तिला ओळखले जाते. ती अनेकदा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीच्या आगामी वेबसिरीजचे शुटींग सध्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सुरू आहे. बुधवारी भोपाळच्या जेहन नुमा हॉटेलमध्ये वेबसिरीजच्या संपूर्ण टीमने प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी श्वेताने गंमतीत हे विधान केले. त्यानंतर अनेकांनी या वादग्रस्त विधानावर आक्षेप नोंदवला. श्वेताच्या या वादग्रस्त विधानानंतर मध्य प्रदेशातील हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली असून श्वेता तिवारीच्या या वक्तव्याचा विरोध केला जावा आणि जे कलाकार देवाविषयी इतक्या खालच्या पातळीला येऊन बोलत असतील अशा कलारांना इथे शुटींग करण्यात परवानगी देऊ नका असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे श्वेता तिवारीने गंमतीत केलेले हे विधान तिच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

श्वेता तिवारी हिंदी टेलिव्हीजनवरील ओळखीचा चेहरा आहे. बिग बॉस 4 ची महाविजेती होती. अनेक मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केले असून प्रेक्षकांनी तिला प्रचंड प्रेम दिले आहे. श्वेता तिवारी कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत राहिली आहे. श्वेताने दोन लग्न केली असून तिची दोन्ही लग्न मोडली आहेत. श्वेताची मुलगी पलक तिवारी देखील सध्या चर्चेत असून अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत ती डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

Share This News

Related Post

OTT And Anurag Thakur

OTT Rule : सरकारने OTT साठी बनवले ‘हे’ नियम; शिवीगाळ आणि अश्लीलतेवर येणार बंदी

Posted by - July 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लोक थिएटर आणि टीव्हीपेक्षा OTT प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. ते मोठ्या प्रमाणात…

मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

Posted by - July 18, 2022 0
पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

18 फेब्रुवारी पासून दहावी चे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन. कसे कराल डाऊनलोड ? 

Posted by - February 17, 2022 0
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत…

स्मार्टफोनवरून चेक करा, रस्त्यावरील गोंगाट, लाऊडस्पीकरचा आवाज

Posted by - May 4, 2022 0
नवी दिल्ली- सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजतोय. मशिदीवर लावलेल्या भोंग्यातून ऐकू येणाऱ्या अजानमुळे नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *