पावसाळी वातावरणात अस्सल गावरान पद्धतीने असे बनवा ‘कांद्याचे भजे’

510 0

पावसाच्या सरी अजून देखील अनेक ठिकाणी बरसतच आहेत. अशात जेव्हा कांद्याचे भजे आणि चहा हातात आला की जिभेला कसा स्वादच मिळतो. पण आज तुम्हाला गावरान कांद्याच्या भज्यांची पद्धत सांगणार आहे. कांद्याचे खेकडा भजे तर तुम्ही खाल्ले असतील पण ही पद्धत सुद्धा झणझणीत भज्यांचा किंवा वडे म्हंटले तरीही चालेल …! मस्त आस्वाद देणारी हिरेसिपि पाहुयात…

See the source image

साहित्य : दोन मोठे कांदे ,डाळीचे पीठ ,हिरव्या मिरच्या (तिखट), हळद, ओवा, जिरेपूड, कोथिंबीर, लिंबू, मीठ, चाट, मसाला.

कृती : सर्वप्रथम कांदे बारीक चिरून घ्या. आता यामध्ये हळद, मिरची बारीक चिरून घाला, कोथिंबीर बारीक चिरलेली, जिरेपूड, ओवा, चाट मसाला घालावा,यावर लिंबू पिळावे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित कांद्यामध्ये मिश्रण करून घ्यावे.

त्यानंतर यामध्ये ३ चमचे डाळीचे पीठ घालून हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. पाण्याची आवश्यकता लागत नाही. आता गॅसवर तेल कडकडीत गरम करून घ्या. भजे तळायला सोडताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. आता हाताला तेल लावून छोटे छोटे बॉल या मिश्रणाचे तेलामध्ये मध्यम तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यानंतर हे बॉल बाहेर काढा. त्यानंतर वाटीच्या सहाय्याने त्यांना दाबून घ्या. जेणेकरून त्यांना वड्यांचा आकार मिळेल आणि आता पुन्हा एकदा हे भजे कडकडीत तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते चांगले तळून कुरकुरीत होतात.

गॅस बंद करा आणि त्या तेलामध्ये छान मिरच्या तळून घ्या. मस्त झणझणीत असे गावरान पद्धतीचे कांद्याचे भजे तयार आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी बनवून झाल्यानंतर ती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका.

Share This News
error: Content is protected !!