पिंपरी चिंचवड : एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं चंद्रकांत पाटील एका जाहीर भाषणात म्हणाले. त्यावर त्यांचे वक्तव्य विनाश काले विपरीत बुद्धीचं म्हणावी लागेल
आपली संस्कृती आहे दोन व्यक्तीलाच नाही. कुणालाच शिव्या द्यायच्या नसतात. त्यांना हवं ते मंत्रीपद मिळाल नसेल म्हणून त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत .तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात खंडिजंगी पाहायला दोघांनी एकमेकांवर टीका केली त्यावर.दसऱ्या मेळाव्यात दोघांचीही भाषण बघितल्यानंतर आता त्यांच्यातील वाद मिटेल असं वाटतं नाही. असे अजित पवार म्हणाले.
शिवसेना कोणाची आहे यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. पण बाळासाहेब ठाकरेंचचं योगदान आहे. शिवसेना उभी करण्यात आणि वास्तव तेच आहे. आता आयोगाने शिवसेना कोणाची आहे ते निर्णय घ्यावा. असे अजित पवार म्हणाले.
यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यावर अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.काही अपघात असे होतात कीं दोष कुणाला द्यायचं हे कळतं नाही.सरकारनें रस्ते सुरक्षा बाबत अधिक काळजी घ्यायला हवी.अपघातग्रस्ता च्या दुःखात मी सहभागी आहे. असे अजित पवार म्हणाले.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यावर अपघातग्रस्तानां जाहीर केल्या गेलेली मदत तुटपुंजी आहे. भरीव मदत द्यायला हवी. अशी मागणी अजित पवार यांनी केली.