मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

90 0

मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर चर्चा होणार का याबाबत उत्सुकता आहे.

या बैठकीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमधील धुसपूस कमी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून कुचंबणा होत असल्याची तक्रार काँग्रेसकडून केली जात आहे. त्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांची आगपाखड थांबणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

दरम्यान, काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत काँग्रेस नेत्यांची त्यांच्या खात्याच्या निधीवरून होणारी अडवणूक, पुढील निवडणूक या विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Jagdish Mulik : वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन

Posted by - October 19, 2022 0
पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचना आज प्रसिद्ध होणार

Posted by - June 2, 2022 0
जिल्हा परिषद पुणे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ३ व परिशिष्ट ३(अ) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा…
Lonavala Accident

Lonavala Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर धावत्या कंटेनरचा टायर फुटून भीषण अपघात

Posted by - September 21, 2023 0
मुंबई : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (Lonavala Accident) घडला आहे. यामध्ये…

महत्वाची बातमी ! धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई…
Ruchesh Jaywanshi

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

Posted by - June 7, 2023 0
सातारा : साताऱ्याचे (Satara) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Ruchesh Jayavanshi) यांची अचानक राज्य सरकारने बदली (Transfer) केली आहे. महाबळेश्वर पाचगणी कास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *