MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

215 0

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक गुरुवारपासून सुरू होत आहे. दरम्यान कोर्टाच्या घटना पिठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्ष चिन्ह यांसंदर्भात कोणताही निर्णय देऊ नये असे आदेश दिले आहेत . त्यामुळे घटनापिठाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणावर काल सुनावणी होती. काल ही सुनावणी झाली नव्हती. कोर्टाच्या आजच्या लिस्टमध्येही या प्रकरणाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी कोर्टात मेन्शन याचिका दाखल करून या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची मागणी केली . त्यानुसार कोर्टाने आज सुनावणी घेतली. मात्र, थोड्या युक्तिवादानंतर कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवत असल्याचं स्पष्ट केलं.

या घटनापीठासमोर 25 ऑगस्ट रोजी पहिली सुनावणी होणार आहे. घटनापीठासमोर या प्रकरणाशी संबंधित 5 याचिकांवर सुनावणी होणार असून घटनापीठाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश एसव्ही रमण्णा हे सुद्धा या घटनापीठात असण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट रोजी रमण्णा हे निवृत्त होत असल्याने 25 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निर्णय येणार की या प्रकरणाचा निर्णय लांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

vodafone

दूरसंचार कंपनी व्होडाफोन ‘या’ कारणामुळे 11 हजार लोकांना कामावरुन काढणार

Posted by - May 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) पुढील तीन वर्षांत 11,000 नोकर्‍या (Job) आपल्या कंपनीतून कमी करणार…

पुणे लोहमार्ग पोलिसांनी निवडला दुसरा ‘मार्ग’ आणि झाली निलंबनाची कारवाई

Posted by - April 7, 2023 0
प्रवाशांना धमकावून लुबाडणारी टोळी तुम्ही ऐकली असेल. पण खाकी गणवेशात साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई…

ब्रेकिंग न्यूज !अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने…

पालखी सोहळ्यासाठी 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

Posted by - June 19, 2022 0
पुणे:- कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा…
Vishal Patil

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Posted by - April 22, 2024 0
सांगली : महाविकास आघाडीत सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेवरून मोठा पेच निर्माण झाला होता. या जागेवर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *