MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

288 0

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक गुरुवारपासून सुरू होत आहे. दरम्यान कोर्टाच्या घटना पिठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्ष चिन्ह यांसंदर्भात कोणताही निर्णय देऊ नये असे आदेश दिले आहेत . त्यामुळे घटनापिठाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणावर काल सुनावणी होती. काल ही सुनावणी झाली नव्हती. कोर्टाच्या आजच्या लिस्टमध्येही या प्रकरणाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी कोर्टात मेन्शन याचिका दाखल करून या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची मागणी केली . त्यानुसार कोर्टाने आज सुनावणी घेतली. मात्र, थोड्या युक्तिवादानंतर कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवत असल्याचं स्पष्ट केलं.

या घटनापीठासमोर 25 ऑगस्ट रोजी पहिली सुनावणी होणार आहे. घटनापीठासमोर या प्रकरणाशी संबंधित 5 याचिकांवर सुनावणी होणार असून घटनापीठाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सरन्यायाधीश एसव्ही रमण्णा हे सुद्धा या घटनापीठात असण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट रोजी रमण्णा हे निवृत्त होत असल्याने 25 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर निर्णय येणार की या प्रकरणाचा निर्णय लांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide