रायगड- महाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या घटनेत सर्वच्या सर्व ६ मुलांचा पाण्यात तडफडून मृत्यू झाला.
महाड तालक्यातील ढालकाटी गावात ही घटना घडली आहे. रुना चिखुरी साहनी असं या महिलेचं नाव आहे. मृतांमध्ये रोशनी साहनी (वय 10 वर्षे), करिष्मा साहनी (वय 08 वर्षे), रेश्मा साहनी (वय 06 वर्षे), विद्या साहनी (वय05 वर्षे), शिवराज साहनी (वय 03 वर्षे) आणि दीड वर्षांच्या राधा साहनी या मुलीचा समावेश आहे.
या महिलेचा पती हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. या त्रासाला पत्नी कंटाळून गेली होती. रागाच्या भरात ढालकाटी गावातील एका शेतात असलेल्या विहिरीजवळ पोहोचली.
तिने आधी सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी मारली. पण, त्याचवेळी तिथून एक आदिवासी जात होता. त्याने तिला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले. तिने जास्त प्रमाणात पाणी प्यायले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे.