लखनऊ भूकंप : डोरेमॉनने वाचवला चिमुकल्याचा जीव; मुलांना कार्टून बघायला थांबवत असाल तर ही बातमी नक्की वाचा !

798 0

लखनऊ : लखनऊमध्ये भूकंपाने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एक मोठी इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 14 ते 15 कुटुंब राहत होते. इमारतीमध्ये एकूण किती जण होते हे सध्या तरी समजू शकल नाही. पण इमारत कोसळल्यानंतर 14 जणांना बचावण्यात यश आला आहे. यामध्ये मुस्तफा नावाच्या सहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. या मुस्तफाला डोरेमॉनने वाचवलं, हो तुम्ही जे वाचताय ते बरोबर आहे !

आपण बऱ्याच वेळा मुलांना कार्टून बघण्यापासून थांबवत असतो. त्यांचे डोळे खराब होतील, विनाकारण त्यांचा वेळ जातोय असं पालकांना वाटत असतं. पण मुलं ते कार्टून फक्त मनोरंजन म्हणून नाही तर किती बारकाईने पाहतात हे या घटनेतून लक्षात येते. तर झालं असं की जेव्हा भूकंप आला तेव्हा संपूर्ण इमारत थरथरायला लागली होती. त्यानंतर घरातल्या सर्वांचीच जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली.

यावेळी घरामध्ये मुस्तफाची आई उजमा आणि आजी बेगम हैदर या होत्य. या दोघींचाही इमारत कोसळल्यानंतर मृत्यू झाला. पण एवढ्या बिकट प्रसंगांमध्ये देखील मुस्तफाला डोरेमॉन मधला तो एपिसोड आठवला ज्यामध्ये भूकंप येतो आणि जीव वाचवण्यासाठी म्हणून नोबिता पलंगाखाली लागतो आणि नेमकं मुस्तफांनी तेच केलं. भूकंप आल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी पलंगाखाली जाऊन लपला. इमारत कोसळली पण त्याचा जीव मात्र वाचला आहे. पण मुस्तफाची आई आणि आजी यांचा दुर्दैवाने मात्र मृत्यू झाला.

Share This News

Related Post

‘त्या’ व्हिडिओ नंतर अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : अ‍ॅडव्होकेट प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. प्रवीण चव्हाण यांनी गिरीश…

Weather Updates : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार; ‘मंदोस’ चक्रीवादळाचा परिणाम

Posted by - December 10, 2022 0
महाराष्ट्र : हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची हुडहुडी भरू लागली असताना थंडीच्या दिवसांमध्येच महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…

पुणेकरांनो , तयारीत राहा ! येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाका आणखी वाढणार

Posted by - February 24, 2023 0
महाराष्ट्र : अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता…

बिल्कीस बानो प्रकरण : बीडमध्ये मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा

Posted by - September 15, 2022 0
बीड : बिल्कीस बानो प्रकरणात बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा निघाला. या निषेध मोर्चामध्ये हजारो महिला…

Big News : INFOSYS चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा

Posted by - March 11, 2023 0
पुणे : इन्फोसिसचे अध्यक्ष मोहित जोशी यांनी राजीनामा दिला आहे. 20 डिसेंबर 2023 पासून टेक महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *