लखनऊ भूकंप : डोरेमॉनने वाचवला चिमुकल्याचा जीव; मुलांना कार्टून बघायला थांबवत असाल तर ही बातमी नक्की वाचा !

866 0

लखनऊ : लखनऊमध्ये भूकंपाने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये एक मोठी इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 14 ते 15 कुटुंब राहत होते. इमारतीमध्ये एकूण किती जण होते हे सध्या तरी समजू शकल नाही. पण इमारत कोसळल्यानंतर 14 जणांना बचावण्यात यश आला आहे. यामध्ये मुस्तफा नावाच्या सहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. या मुस्तफाला डोरेमॉनने वाचवलं, हो तुम्ही जे वाचताय ते बरोबर आहे !

आपण बऱ्याच वेळा मुलांना कार्टून बघण्यापासून थांबवत असतो. त्यांचे डोळे खराब होतील, विनाकारण त्यांचा वेळ जातोय असं पालकांना वाटत असतं. पण मुलं ते कार्टून फक्त मनोरंजन म्हणून नाही तर किती बारकाईने पाहतात हे या घटनेतून लक्षात येते. तर झालं असं की जेव्हा भूकंप आला तेव्हा संपूर्ण इमारत थरथरायला लागली होती. त्यानंतर घरातल्या सर्वांचीच जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली.

यावेळी घरामध्ये मुस्तफाची आई उजमा आणि आजी बेगम हैदर या होत्य. या दोघींचाही इमारत कोसळल्यानंतर मृत्यू झाला. पण एवढ्या बिकट प्रसंगांमध्ये देखील मुस्तफाला डोरेमॉन मधला तो एपिसोड आठवला ज्यामध्ये भूकंप येतो आणि जीव वाचवण्यासाठी म्हणून नोबिता पलंगाखाली लागतो आणि नेमकं मुस्तफांनी तेच केलं. भूकंप आल्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी पलंगाखाली जाऊन लपला. इमारत कोसळली पण त्याचा जीव मात्र वाचला आहे. पण मुस्तफाची आई आणि आजी यांचा दुर्दैवाने मात्र मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!