दोन बायका फजिती ऐका : न्यायालयाचा अजब निर्णय; अशी केली नवऱ्याची वाटणी !

629 0

ग्वाल्हेर : आजपर्यंत अनेक नवरा बायकांची भांडण तुम्ही ऐकली असतील. एकच नातं टिकवणे आज-काल अवघड झालं असताना, या दोन लग्न केलेल्या नवऱ्याला शेवटी न्यायालयानेच असा धडा शिकवला आहे.

तर झालं असं की, मध्य प्रदेश मध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तीची दोन लग्न झाली आहेत. या दोन्ही बायका पतीवरील हक्क सांगण्यासाठी न्यायालयात गेल्या असता न्यायालयाने एक अजब निर्णय सुनावला आहे.

सुनावणी वेळी न्यायाधीशांनी या प्रकरणावर तोडगा काढताना म्हटलं आहे की, आठवड्यातले तीन दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि आठवड्यातली तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत यास आता राहावे लागणार आहे. तर रविवारी काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार पतीला न्यायालयाने दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!