हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

256 0

मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी ‘चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया’ असे ट्विट केले होते. आता दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले आहेत. किरीट सोमय्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट आव्हान दिलं आहे.

अनिल परब म्हणाले, ” हा रिसॉर्ट माझा नाही. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का…? किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब म्हणाले.

किरीट सोमय्या नौटंकी करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू म्हणून. पण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना ?

परब म्हणाले, “सोमय्या फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते ? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी”

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवले

दरम्यान अनिल परबांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा घेऊन जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना दापोली पोलिसांनी थांबवले होते. कशेडी घाट उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आणि त्यांची गाडी थांबवली. त्यानंतर तेथे एकच गोंधळ माजला. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना नोटिशीबाबत विचारणा केली असता, पोलिसांनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त तुम्ही नोटीस स्वीकारा असं ते म्हणाले. त्यावेळी संतप्त किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंचे पोलीसही उद्धट आहेत, असं ते म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!