मुंबई- मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करत असताना मास्क, सॅनिटाझर, लसीकरण ही त्रिसुत्री कोरोना बचावापासून महत्त्वाची ठरली.
मात्र आता कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असून कोरोना लसीकरणाची कॉलर ट्यून तत्काळ बंद करा अशी मागणी मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
याबाबत नांदगावकर यांनी ट्विट केलं असून कोरोना लसीकरणची कॉलर ट्यून तात्काळ बंद करा. अनेक महत्वाचे फोन लवकर लागत नाही, फोन लागला की नाही तेही कधी कधी कळत नाही. जी काही जनजागृती करायची होती ती झाली आहे म्हणूनच 180 कोटी डोस दिले गेले आहेत. असं ट्विट नांदगावकर यांनी केलं आहे.
कोरोना लसीकरण ची कॉलर ट्यून तात्काळ बंद करा. अनेक महत्वाचे फोन लवकर लागत नाही, फोन लागला की नाही तेही कधी कधी कळत नाही. जी काही जनजागृती करायची होती ती झाली आहे म्हणूनच 180 कोटी डोस दिले गेले आहेत.@zee24taasnews@TV9Marathi@News18lokmat @abpmajhatv @saamTVnews
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 26, 2022