Kirit somayya

Kirit Somaiya : किरीट सोमय्याचे पत्र आले समोर; म्हणाले मी कोणत्याही महिलेसोबत तसं काही केले नाही

581 0

मुंबई : भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त प्रसारित करून पूर्ण खळबळ उडवून दिली होती. या व्हिडिओवरून आता विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे असे अनेक व्हिडिओ असल्याचा दावा देखील या वृत्तवाहिनीकडून करण्यात आला होता. या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याचा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, व्हिडीओ प्रसारित होताच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. या पत्रात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कथित व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

काय लिहिले आहे पत्रामध्ये?
प्रति,

मा. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. देवेंद्रजी

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.

Share This News
error: Content is protected !!