कियारा सिद्धार्थचे ठरलयं ! ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

696 0

मुंबई : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हि जोडी बॉलिवूडची फेव्हरेट जोड्यांपैकी एक आहे. नुकताच कियाराचं गोविंदा मेरा नाम तर सिद्धार्थचा थँक गॉड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली. सिद्धार्थ आणि कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत असतानाच नुकताच दोघांच्या लग्नाची तारीख देखील जाहीर झाली आहे.

See the source image

येत्या नवीन वर्षांमध्ये अर्थात फेब्रुवारी ६ ला कियारा आणि सिद्धार्थ लग्नगाठ बांधणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न राॅयल पध्दतीने होणार आहे.

See the source image

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न तीन दिवस चालणार असून यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थात या सर्व माहितीला कियारा किंवा सिद्धार्थने दुजोरा दिलेला नाही.

Share This News
error: Content is protected !!