पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पुन्हा बैठक होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हि बैठक घेणार असून आज संध्याकाळी 7 वाजता भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार कोण यावर चर्चा सुरु आहे. या आधी झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवार दिल्लीमधून लवकरच जाहीर करण्यात येतील असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान आज पुन्हा भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये आज काय चर्चा होणार ? हे पाहणे कसबा मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.