श्री शंकर महाराज समाधीस्थळी प्रकटदिन सोहळ्या निमित्त लोटला लाखो भक्तांचा जनसागर VIDEO

1136 0

धनकवडी : पुणे सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री.शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या असून,प्रकट दिनानिमित्त श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये कीर्तन महोत्सव तसेच श्री.शंकर महाराजांची चरित्र भावकथा व रक्तदान शिबिर आदी उपक्रम घेण्यात आले.

आज होणारी गर्दी पाहता समाधी मठाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियोजन व भक्तांना दर्शन रांगेत लवकर दर्शन कसे होईल या संदर्भात काळजी घेण्यात आली आहे. तसेच भाविक भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर व सचिव सतीश कोकाटे यांनी दिली. पुणे शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी प्रकट दिनाचे औचित्य साधून पहाट पासूनच दर्शनाला उपस्थिती लावली होती.

Share This News
error: Content is protected !!