Steel Man of India : जमशेद जे इराणी यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन

293 0

जमशेदपूर : जमशेद जे इराणी यांचे सोमवारी रात्री जमशेदपूर येथे निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ हा टाटा स्टील सोबत व्यतीत केला. त्यामुळेच त्यांना ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ (Steel Man of India) म्हणून ओळखले जात होते. टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून 2011 साली ते निवृत्त झाले.

टाटा स्टील कंपनीला विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून देणारे जमशेद जे इराणी यांचा जन्म नागपूर मध्ये जीजी इराणी आणि खोरशेद इराणी यांच्या घरात झाला. नागपूर मध्येच त्यांनी सायन्स कॉलेजमधून बीएससी आणि त्यानंतर नागपूर विद्यापीठातून भूमीज्ञान विषयांमध्ये एम एस सी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ब्रिटन मधील शेफिल्ड विद्यापीठामधून त्यांनी धातुशास्त्रात पदव्युत्तर आणि 1963 मध्ये पीएचडी शिक्षण पूर्ण केले.

1978 मध्ये ते जनरल सुप्रीटेंडंट तर, 1979 मध्ये जनरल मॅनेजर आणि 1985 मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले. 1988 मध्ये टाटा स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि 1992 मध्ये व्यवस्थापकीय संचालक झाले. 2001 मध्ये ते सेवानिवृत्त झाले इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डीजी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबीन,निलोफर आणि तनाज असा परिवार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!