मुंबईच्या श्रेयस अय्यर कोट्यधीश ! श्रेयसवर सर्वाधिक 12.25 कोटीची बोली

551 0

मुंबई- आयपीएलच्या 2022 हंगामाचा लिलाव सुरु आहे. यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर कोट्यधीश ठरला आहे. आक्रमक फलंदाजी, मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि कर्णधारासारखा विचार करण्याची पद्धत यामुळे श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस झाला आहे. जबरदस्त फार्मात असलेल्या श्रेयसला चांगली बोली लागणार असल्याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणं श्रेयसला कोलकाता संघानं आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम देत खरेदी केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडल्यानंतर श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावली जाईल, असा अंदाज होता. ऑक्शनमध्ये अय्यरच्या नावाच पुकार होताच त्याच्यावर मोठी बोली लागण्यास सुरुवात झाली. श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. श्रेयस केकेआरचा कॅप्टन बनू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कुठलाही कर्णधार नाहीय. 2015 मध्ये पहिल्यांदा श्रेयस अय्यरवर बोली लागली होती. त्यावेळी दिल्लीने अय्यरला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनकडून आली. त्याला पंजाब किंग्सने 8.25 कोटींना विकत घेतले आहे. तर राजस्थान रॉयल्सने ऑफस्पिनर आर अश्विनला पाच कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

आतापर्यंत खेळाडूंना लागलेली बोली

श्रेयस अय्यर- 12.25 कोटी (कोलकाता)

शिखर धवन- 8.25 कोटी (पंजाब किंग्स)

आर अश्विन- 5 कोटी (राजस्थान)

ट्रेण्ट बोल्ट- आठ कोटी (राजस्थान)

कगिसो रबाडा- 9.25 कोटी (पंजाब)

पॅट कमिंस- 7.25 कोटी (कोलकाता)

मोहम्मद शामी- 6.25 कोटी (गुजरात)

फाफ डू प्लेसीस- 7 कोटी (बंगळुरु)

कोणत्या फ्रँचायझींकडे रक्कम किती ?

पंजाब किंग्स : 72 कोटी रुपये

सनरायझर्स : 68 कोटी रुपये

राजस्थान रॉयल्स : 62 कोटी रुपये

आरसीबी : 57 कोटी रुपये

मुंबई : 48 कोटी रुपये

चेन्नई : 48 कोटी रुपये

कोलकाता : 48 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स : रु. 47.5 कोटी

लखनौ : 59.8 कोटी रुपये

अहमदाबाद : 52 कोटी रुपये

Share This News
error: Content is protected !!