‘स्त्रीभ्रूण हत्त्यांचा जिल्हा’ अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचं स्वागत

289 0

बीड : जो बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी बदनाम झाला होता. त्याच बीड जिल्ह्यात एका दाम्पत्यांनं कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून तिचं जल्लोषात स्वागत केलं.

माजलगाव तालुक्यातील लऊळ इथल्या राठोड कुटुंबात एका चिमुकलीचे आगमन झाले. त्यामुळे या कुटुंबाचा आनंदाला पारावर उरला नाही. मुलगी झाली म्हणून या कुटुंबांने फटाक्यांची आतषबाजी,फुलांच्या पायघड्या आणि गावभर जिलेबी वाटून तिचं स्वागत केलं.बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्त्याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात देखील मोठी घट झाली होती. आता त्याच जिल्ह्यात मुलगी जन्मली म्हणून असं स्वागत केल्याने राठोड कुटुंबाचं कौतुक केलं जातंय.

Share This News
error: Content is protected !!