माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू

297 0

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून श्री. बागुल यांनी पदभार स्वीकारला.

याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून श्री. बागुल यांचे स्वागत केले.

महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही श्री. बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. श्री. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी श्री. बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी श्री. बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

#PUNE : शिवसेना-वंचित आघाडी युतीच्या घोषणेचे पुण्यात कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

Posted by - January 23, 2023 0
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन…

PUNE POLICE : पुण्याचे सिंघम ! जो नागरिकांना नडला, त्याला पोलिसांनी तोडला !

Posted by - December 30, 2022 0
पुणे : याद राखा गुंडांनो, नागरिकांना नडाल तर पोलिसांकडून धू-धू धुतले जाल..! पुणे पोलीस आहेत हे पुणे पोलीस… त्यांच्या नादाला…

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - August 11, 2022 0
विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. काल ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर…
Nitin Gadkari

पुण्यातील भाजपच्या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणारा अनुपस्थित; समोर आलं हे मोठं कारण

Posted by - July 21, 2024 0
पुणे: पुण्यात आज भारतीय जनता पक्षाचे एक दिवसीय प्रदेश अधिवेशन संपन्न होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यकर्त्यांना संबोधित करणार…

धक्कादायक : धुळ्यात अवघ्या 3,400 रुपयांच्या वादातून 39 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
धुळे : धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळ जनक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *