#CRIME : संतापाच्या भरात पत्नीवर केला कुऱ्हाडीने वार; नंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन दिली खुनाची कबुली

1545 0

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ढाकेफळ शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पतीने संतापाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आणि तिची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खुनाची कबुली दिली आहे.

अधिक वाचा : #VIDEO : विकृताचे तरुणीसमोरच स्वतःच्या प्रायव्हेट पार्ट सोबत अश्लील चाळे; तरुणीने थेट शूट केला व्हिडिओ, आणि मग घडले असे काही !

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. आरती थोरात (वय वर्ष 25) आणि तिचा पती भगवान थोरात या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की संतापलेल्या पतीने पत्नीला जमिनीवर पाडून तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने साप सप वार केले आहेत.

अधिक वाचा : हृदय पिळवटून टाकणारी घटना : कोल्हापुरात 9 महिन्याच्या बाळाचा गव्हाच्या पिठात पडल्याने श्वास गुदमरून मृत्यू

या हल्ल्यामध्ये आरती यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर भगवान थोरात यांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पतीला ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!