हाय प्रोफाइल चोर; विमानाने यायचे आणि आयफोन चोरायचे; 30 लाख 39 हजार रुपयांचे 39 मोबाईल जप्त

461 0

पुणे : विमानाने येऊन आयफोन चोरणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या हाय प्रोफाईल चोरट्यांकडून 30 लाख 27 हजार रुपयांचे 39 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईल मध्ये 21 आयफोन असल्याचे समजते.

असद गुलजार मोहम्मद, निजाम बाबू कुरेशी, शहाबाद भोले खान, राहुल लीलीधर कंगाले आणि नदीम इब्राहिम मलिक या भामट्यांना अटक करण्यात आली आहे. हाय प्रोफाईल कॉन्सर्टमध्ये जाऊन मोबाईल चोरी करणाऱ्या या भामट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

नगर रोडवरील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी 24 आणि 26 फेब्रुवारीच्या दरम्यान वी एच वन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस पथकाने गस्त घालत असताना असद महंमद हा संशयितरित्या फिरत असताना दिसला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा उलगडा झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!