Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार जोरदार पाऊस; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

1561 0

मुंबई : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता
आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टीवरील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

याचबरोबर नैऋत्य मोसमी मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!