हृदय पिळवटून टाकणारी घटना : कोल्हापुरात 9 महिन्याच्या बाळाचा गव्हाच्या पिठात पडल्याने श्वास गुदमरून मृत्यू

1477 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यात अत्यंत दुखद घटना घडली आहे. एका नऊ महिन्याचे चिमुकले बाळ पिठात पडला. त्यानंतर पीठ तोंडातआणि नाकात अडकल्याने त्याचा श्वास बंद झाला आणि त्यामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा : #VIRAL VIDEO : तुर्कीमध्ये भूकंपाचा हाहाकार ! कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली आईने दिला बाळाला जन्म; व्हिडिओ होतो आहे व्हायरल…

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कृष्णराज यमगर (वय ९ महिने) असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याच नाव आहे. करवीर तालुक्यातील वडणगे येथे आजीकडे गेले असताना वॉकर मधून चालत असताना गव्हाच्या पिठाच्या बुट्टीत बाळ तोल जाऊन पडले. त्यावेळी आजीने गव्हाच्या पिठातून त्याला बाहेर काढले पण तोपर्यंत कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ अडकले ते पीठ त्याच्या नाकात आणि तोंडात चिटकल्याने त्याचा श्वास गुदमरला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

अधिक वाचा : डायलॉगबाजी भोवली : रस्त्यात तरुणीची छेड काढताना ओठावरून फिरवली 100 ची नोट; म्हणाला, “तू इतना भाव क्यू खाती है…?” रोडरोमिओला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

Share This News
error: Content is protected !!