HEALTH WEALTH : टाच दुखीवर घरगुती ठोस उपाय; नक्की करून पहा

1470 0

टाच दुखी हा अगदी सामान्यपणे होणारा त्रास आहे तुमचे वय आणि पेशा काहीही असू द्या दिवसभर उभे राहिल्यामुळे पाय दुखणे टाचा दुखणे हा त्रास हमखास होत असतोच. रात्री झोपताना हा त्रास अधिक जाणवतो. चला तर मग पाहूयात टाच दुखीवर सोपे घरगुती उपाय…

1. एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये गरम पाणी करा. कोल्ड्रिंकच्या येणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स थोड्या टनक असतात. या बाटलीचा वापर करायचा आहे. आता ही गरम पाण्याची बाटली पायाखाली ठेवा आणि एखाद्या बैठकीवर बसून ही बाटली पायाखाली दाबून मागेपुढे फिरवा. यामुळे तळपायाला हलका मसाज होईल आणि गरम पाण्यामुळे शेकल्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळेल.

2. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुऊन कोमट खोब-याच्या तेलाने तळ पायाला गोलाकार मसाज करा.

3. एका टबमध्ये तुमच्या घोट्यापर्यंत पाय बुडेल एवढे गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा खडी मीठ घाला आणि यामध्ये दहा मिनिटे तरी पाय बुचकळून ठेवा.

4. रात्री झोपताना कमरेपासून पाय भिंतीला वर टेकून दहा मिनिटे तरी तसेच राहू द्या. पाय दुखणे तात्पुरते थांबेल.

या काही उपायांनी तुम्हाला तुम्हाला नक्की आराम मिळेल. पण दिवसभरातल्या काही सवयी टाळा. तुम्हाला जर टाच दुखी किंवा पाय दुखी अधिक असेल तर चांगल्या कंपनीच्या आरामदायी चपला वापरण्यास लगेच सुरुवात करा. घरामध्ये देखील डॉक्टर चप्पल घालून वावरा. अधिक त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.

Share This News
error: Content is protected !!