तुमचा मनस्ताप वाढवणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे ? फक्त फॉलो करा ‘या’ पाच टिप्स

694 0

असं कोणी नसतच ज्याच्या आयुष्यात मनस्ताप वाढवणार नाही. असे लोक नसतात पण बऱ्याच वेळा असं होतं की यातल्या अनेक लोकांपासून तुम्हाला लांब जाता येत नाही. अर्थात त्यांच्याशी असलेले जवळचे नाते हे तुम्हाला त्यांच्यासोबत राहायला भागच पाडते. त्यामुळे तुम्ही त्या मनस्तापापासून वाचूच शकत नाही. यासाठी तुम्हाला आता या पाच टिप्स मदत करू शकतात.

1. सर्वात महत्त्वाचं या लोकांना टाळू नका. जग गोल आहे, कधी ना कधी हे लोक तुमच्यासमोर येणारच. त्यामुळे या लोकांना फेस करायला शिका. त्यांच्यापासून लांब राहण्याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या सोबत राहताना कसं वागायचं काय बोलायचं काय नाही बोलायचं हे लक्षात घ्या.

2. मनस्ताप वाढवणाऱ्या लोकांमध्ये जास्त करून वयाने मोठे आणि नात्याने मोठे असणारे लोक असतात. त्यामुळे ते जे काही बोलतात ते आपल्याला ऐकून घ्यावंच लागतं आणि त्यामुळे मनस्तापात भर पडत असते. आता पहिली टीप पुन्हा वाचा आणि आता हे लक्षात घ्या की हे लोक तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला काहीतरी सल्ला, उपदेश किंवा टोमणा मारणारच आहेत. अशावेळी दोन कानांचा उपयोग करा एका कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडून द्या.

3. ही व्यक्ती भेटल्यावर मनाला आधीच सांगून ठेवा की ही व्यक्ती जे बोलणार आहे त्याने आपल्या मनाला काहीतरी ठेच लागणारच आहे. मनाची तयारी करूनच ठेवा.

4. आता जेव्हाही लोक तुम्हाला सल्ला उपदेश देतात त्यावेळी या लोकांना फक्त एका शब्दामध्येच उत्तर द्या. हो, नाही, ठीक आहे, चालेल… याच शब्दांचा वापर करा. बोलतील नंतर थकतील आणि नंतर बोलायचं सोडून देतील.

5. आता या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती व्यक्ती जे काही बोलतीये जे काही सांगतीये त्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नका. त्या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्ही जेवढे जास्त किंमत द्याल तेवढेच तुम्हाला जास्त ऐकावं लागेल. त्यामुळे ऐकून न ऐकल्यासारखे करण्याचे कौशल्य शिकून घ्या. ही व्यक्ती ऑटोमॅटिक बोलणं कमी करेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!