हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापर्यंत ३३.०९ टक्के मतदान

1879 0

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. दुपारपर्यंत ३३.०९ टकक्यांपर्यंत मतदान झाले आहे.

निवडणुकीत एकूण ५७ उमेदवार रिंगणात असून १७ हजार ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. ४ मतदान केंद्रातील ३१ मतदान बुथवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. वीस वर्षांनंतर ही निवडणूक लागल्याने या निवडणुकीला खूप महत्त्व आले आहे. या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते -व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत.

सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. व्यापारी आडते मतदार संघातून २ जागेसाठी सर्वाधिक मतदार आहेत . यामध्ये १२ उमेदवार रिंगणात उतरले असून जय शारदा गणेश पॅनल व जनशक्ती पॅनल व व्यापारी विकास पॅनल यामध्ये खरी लढत आहे. तर तर हमाल मापाडी या संघातून एक जागेसाठी ५ जण रिंगणात आहेत. यामध्येही चुरस सुरू आहे.

मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली आहे. यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत दोन तासात १३ टकक्यांपर्यंत मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide