Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

207 0

मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. 

अ‍ॅड. सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आले. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, सिल्वर ओकवर हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. त्यानुसार हे आंदोलन पूर्वनियोजित होतं आणि त्यासाठी एक बैठक सुद्धा घेण्यात आली होती असा दावा सरकारी वकिलांनी केला.

Share This News
error: Content is protected !!