‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन करुन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली, तसंच त्याला कुस्ती कारकिर्दीतील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघाने आयोजित केलेल्या ६४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत
‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने लढाऊ वृत्तीने विजय मिळवला. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याचा पृथ्वीराज पाटील सैन्यदलात सेवा करीत आहे.
त्याने जिंकलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढणारा आहे. पृथ्वीराज सारखे नव्या दमाचे पैलवान महाराष्ट्राच्या कुस्तीची गौरवशाली परंपरा पुढे नेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.