Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

130 0

मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. 

अ‍ॅड. सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर करण्यात आले. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, सिल्वर ओकवर हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्वर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. त्यानुसार हे आंदोलन पूर्वनियोजित होतं आणि त्यासाठी एक बैठक सुद्धा घेण्यात आली होती असा दावा सरकारी वकिलांनी केला.

Share This News

Related Post

UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

Posted by - January 20, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी…

कर्नाटकात भीषण अपघात ; 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Posted by - March 19, 2022 0
कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक…

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानाला आग

Posted by - October 17, 2022 0
पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानात आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे…

वनविभागाचा मोर्चा वळाला विशाळगडावर; ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

Posted by - December 9, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले महाराष्ट्रात आजही खंबीरपणे उभे आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूंवर…
Pune Transport

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Posted by - December 29, 2023 0
पुणे : कोरेगाव भीमा जवळ पेरणे फाटा येथे (Pune Transport) 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *