क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

382 0

पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ट्वेन्टी 20 क्रिकेट सामना रंगणार आहे. भारत – श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी 20 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातला दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात दिवस रात्र रंगणार आहे.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामना तर तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय कसोटी, 7 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 तसेच आयपीएलचे 51 सामने झाले आहेत. 2016 मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. 2020 मध्ये झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा 78 धावांनी पराभव केला होता.

5 जानेवारीला क्रिकेटप्रेमींना भारत- श्रीलंका ट्वेन्टी 20 सामन्याचा आनंद घेता येणार आहे. सामन्याच्या तिकीट विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि गहूंजे येथील मैदानावर सकाळी 10 ते 6 या वेळेत तिकीटं उपलब्ध असतील.

Share This News

Related Post

हैदराबादमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली, अभिनेते, राजकीय नेत्यांचा सहभाग

Posted by - April 4, 2022 0
हैदराबाद- हैद्राबाद मधील उच्चभ्रू वसाहत म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये सुरु असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली…

शुभदा सहस्रबुद्धे यांचे पुण्यात शुक्रवारपासून ‘कार्त दे विझीत’ चित्र प्रदर्शन

Posted by - June 7, 2022 0
पुणे- चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांच्या ‘कार्त दे विझीत’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शुभदा सहस्रबुद्धे यांनी चारकोल…
Amrawati News

Amravati News : झाडाचा आश्रय घेणे पडले महागात; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू

Posted by - July 20, 2023 0
अमरावती : सध्या राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यादरम्यान अमरावती (Amravati News)…

Ground Zero : पुण्यनगरी की ‘ट्रॅफिकनगरी’ ? पुण्यात सर्वत्र तुफान वाहतूक कोंडी

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा नाहक त्रास पुणेकरांना सहन करावा…
Crime

वाकड येथे पोलिसांच्या अंगावर आरोपीनं सोडलं कुत्रं ! गांजा विक्रीप्रकरणी कारवाई दरम्यान घडली घटना

Posted by - September 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड शहरात गांजा विक्री करणाऱ्या तडीपार आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर, आरोपींनी चक्क पाळीव कुत्रा सोडून हल्ला चढवला. या घटनेत पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *