सोन्याचा नवीन विक्रम ! 28 महिन्यांचा मोडला रेकॉर्ड, वाचा आजचे सोन्याचे प्रति तोळा दर

2028 0

गेल्या काही वर्षापासून सोन्याच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या जगावर आर्थिक मंदीचं सावट घोंगावत असताना आता सामान्यांचं कंबरडं मोडल आहे. सामान्य गरजा पूर्ण करण्याबरोबर आता सोन्याने देखील उंच उडी मारली आहे. आजचा सोन्याचा दर हा 28 महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला आहे.

16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळून 56 हजार 883 रुपये प्रति तोळा एवढा नोंद करण्यात आला आहे. गेल्या नऊ महिन्यात सोन्याचे दर दुपटीने वाढले आहेत.

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर 24 कॅरेट सोनंच खरेदी करा. दागिन्यांच्या घडणावळीवेळी 22 ,21 ,20 किंवा 18 कॅरेट शुद्धतेमध्येच दागिने बनवले जातात. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन खरेदी करा.

Share This News
error: Content is protected !!