मुंबई : धनुष्यबाण चिन्हाचा आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर फैसला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी ही सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते आहे. येत्या 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत असून यासाठीच शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. तथापि ही परवानगी जर नाकारली गेली तर हा सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सायंकाळी चार वाजता उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद आणि धनुष्यबाण चिन्ह यावर युक्तिवाद सुरू होणार आहे.