Gang rape case : यूपीतील माजी सपा आमदार विजय मिश्रा यांच्या मुलाला पुण्यात ठोकल्या बेड्या ; एक वर्षापासून होता फरार …

372 0

उत्तर प्रदेश : सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी विष्णू मिश्रा याला पुण्यात हडपसर परिसरातील ऑक्सिजन विला या आलिशान इमारतीतुन ताब्यात घेण्यात आले आहे. विष्णू मिश्रा हा उत्तर प्रदेशातील भदोही येथील सामाजिक पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा आहे. 40 वर्ष विजय मिश्रा हे आमदार होते.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , विष्णू मिश्रा हा सामूहिक बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच बरोबर त्याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी वृत्तीची असल्याचे समजते. एक वर्षापासून मिश्रा फरार होता. उत्तर प्रदेश मधील पोलीस त्याचा कसून तपास करत होते .परंतु वर्षभर हा सापडून न आल्यामुळे उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील बोट उचलले जाऊ लागले होते.

तपासा दरम्यान मिश्रा यांचे एक नातेवाईक पुण्यात राहतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले होते. हडपसर पोलीस पथक देखील उत्तर प्रदेश पोलिसांसोबत संशयित आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस स्टेशनच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांसोबत या आरोपीला हडपसर परिसरातील ऑक्सिजन विला या आलिशान इमारतीतून ताब्यात घेतले आहे.

सोमवारी कॅम्प परिसरातील लष्कर न्यायालयात या आरोपीस हजर करून ट्रान्सलेट रिमांड घेऊन उत्तर प्रदेश पोलीस त्यास पुढील तपासासाठी घेऊन जाणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!