पुणे : अभिनेता शरद पोंक्षे हे त्यांच्या दर्जेदार अभिनय कौशल्यासह त्यांच्या सडेतोड वक्तव्या बाबत देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते अनेक वेळा ट्रोल देखील होत असतात. सध्या ते पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा शिकार झाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या जहरी टिकेमुळे पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये बोलत असताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट टीका केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , “महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे ? प्रत्येक गावात असे विद्यालय हवे ,असे सावरकर कार्यक्रम व्हायला हवेत. मुलांनी छान कार्यक्रम केला. मी त्यांचं कौतुक करतो. ही मुलं बघा आणि दिल्लीतला मुलगा बघा या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही. अशी टीका पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली आहे.
यावर सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. दरम्यान सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनीही त्यांना थेट आव्हान दिले आहे. चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणतात की,
” दहशतवाद विरूद्ध संविधान…
पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर… कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो. तुम्ही मोदी शहांचे दिल्लीचे पोलीस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलीस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो. आहे का तयारी?”
“दहशत बसली पाहिजे पण कोणाला? हिंदूंनाच बरं का! गांधींपासून दाभोळकरांपर्यंत हिंदूंनाच! या माणसाच्या दैवताची बॅरिस्टर जीनांना गोळी घालायची हिंमत नव्हती, तिकडे तसं केलं असतं तर नथ्थू जागेवरच खलास केला गेला असता. भारतात संविधान आणि कायदा यांचं संरक्षण काही काळ तरी नक्कीच मिळणार होतं. आणि हिंदू सहिष्णू होते. काॅग्रेस सहिष्णू आहे तितकी लीग सहिष्णू नाही याची कल्पना स्वातंत्र्यानंतरचा पहिला अधिकृत दहशतवादी नथूरामाला आणि त्याला आशिर्वाद देणार्या दहशतवाद्यालाही होती. हिंदू सहिष्णू आहेत म्हणून हे गांधींपासून दाभोलकर, पानसरेंपर्यंत हिंदू धर्मात सुधारणा करणाऱ्यांना बिनधास्त मारत आले. ‘अल-कायदा’ किंवा गेला बाजार ‘सीमी’शी लढण्याची यांची आहे का हिंमत या दहशतवाद्यांची?” दहशतवादी म्हणल्यावर राग नको यायला आता उलट यांना अभिमान वाटला पाहीजे. यापुढे यांच्या दैवतांना आपण ‘दहशतवादी’ म्हणू शकतो बरं का! कारण दहशत हवीच.”
यांची मुलं जातील अमेरिकेला, तुमची मुलं दहशतवादी बनतील. बहुजनांनो सांभाळून रहा! पोंक्षे, तुमच्या मुलीला या देशात दहशतवादी होण्याचं उत्तम करीयर द्यायचं सोडून पायलट होण्यासाठी परदेशात का पाठवलं ? असा सवालही त्यांनी केला आहे .