शिरूर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी तारडोबा ची वाडी येथील शिवतारा कृषी पर्यटन केंद्रात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भाजपा नेते, माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. परवाच त्यांची भेट घेतली होती.
शेती क्षेत्रात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. सेंद्रिय शेतीसाठी ते आग्रही असत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
ॐ शान्ति🙏 pic.twitter.com/lLwBAnWe6q— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) August 11, 2022
काही दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते आज कर्करोगामुळे दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे
राजकीय कारकीर्द
- 1995 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली . ही निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती.
- त्यानंतर 1999 साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले . त्यानंतर त्यांना यश मिळाले .
- 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि पुन्हा एकदा विधानसभेत निवडून आले.
- 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता . परंतु पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली परंतु त्यावेळी त्यांना यश मिळू शकले नाही.
- 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक जिंकली .
- त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला होता .
- त्यानंतर कर्करोगामुळे त्यांनी राजकारणामधून विश्रांती घेतली होती.